गुटखा विक्री प्रकरणी नवरा, बायकोवर गुन्हा दाखल.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

:वार्ताहर:वानवडी पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक व अंमलदार हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, बारामती चिकन ऑंग्रों चिकन शॉपच्या गल्लीत, रामनगर, छोटी मस्जिदजवळ, रामटेकडी, हडपसर पुणे येथील घरात गुलफाम अन्सारी व त्यावी पल्नी नुरजहाँ गुलफाम अन्सारी हे वेगवेगळया कंपनीचा पान मसाला, गुटखा त्यामध्ये मिश्रीत करण्याची तंबाखुजन्य पदार्थ त्यास शासनाने प्रतिबंधित केले असताना देखील व त्याच्या सेवनाने आरोग्याच्या दृष्टीने घातक तसेच मुखाचे कर्करोग व इ्तर विकार होवुन शारीरीक हानी होते हे माहित असतांनाही विक्री करीत आहेत. सदर बातमीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी जावून आजूबाजूला ‘ पाहिले असता’ वर नमूद पतीव पत्नी’ वेगवेगळया कंपनीचा पान मसाला, गुटखा त्यामध्ये मिश्रीत करण्याची तंबाखुजन्य पदार्थ त्यास शासनाने प्रतिबंधीत केले असताना देखील विक्री करीत होते. सदर रूमची झ़डती घेतली असता त्यांचे रूममध्ये प्रतिबंधित पान मसाला व तंबाखुजन्य पदार्थ असा एकुण 1,62,184 रु.कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर नम्द इसम गुलफाम अन्सारी वय-४५ वर्ष रामनगर,छोटी मजिदजवळ , रामटेकडी, हडपसर, पुणे व त्याची पत्नी नुरजहॉ गुलफाम अन्सारी, वय ४ वर्षे, रा.सदर ‘ यांचे विरुध्द वानवडी पोलीस स्टेशन गु.र.नं. ४९९/२०२५ भा.न्या.सं.क १२३.२२३.२७४.२७५ सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य उत्पादन पुरवठा व वितरण यांचे विनीमय) अधिनियम कलम ७ (२) व २० (२) अन्न सुरक्षा मानके अधिनियम कलम २००६, चे कलम २६(२)(i)(iv) चे उल्लंघन केल्याने कलम ५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे,
. अपर पोलीस आयूक्त , मनोज पाटील,.पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ राजलक्ष्मी शिवणकर,सहा. पोलीस आयुक्त, वानवडी नम्रता देसाई यांचे मार्गर्शनाखाली वरिष्ट पोलीस निरीक्षक वानवडी भाऊसाहेब पाटील, विजयकुमार डोके यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक .उमाकांत महाडिक पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख तसेच पोलीस अंमलदार ‘ दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, आशिष कांबळे, अतुल गायकवाड, विष्णू सुतार, गोपाळ मदने, अभिजित चव्हाण, अमोल गायकवाड, अर्शद सय्यद, विड्ठल चोरमले, बालाजो वाघमार व महिला पोलीस अंमलदार वैत्राली यादव या पथकाने केली.

Leave a Comment

और पढ़ें