न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाला प्रभाग क्रमांक २२ मधील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मोनिका नवनाथ नढे हे प्रभागाचे नेतृत्व करणार नागरिकांचा निर्धार

काळेवाडी : प्रभाग क्रमांक २२ मध्ये जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ दादा नढे पाटील सोशल फाउंडेशन आयोजित न्यू होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम नढे नगर, विजयनगर, पवनानगर, आदर्श नगर, काळेवाडी मधील खास लाडक्या बहिणीसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाला प्रभागातील शेकडोच्या संख्येने महिलांनी सहभागी होऊन खेळ ,गप्पा, गोष्टी,मनोरंजन, प्रश्नमंजुषा व विविध स्पर्धेत  सहभाग घेऊन अनेक प्रकारचे आकर्षक बक्षीस व पैठणी  जिंकली.
न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमांमध्ये सहभागी प्रथम क्रमांक ई बाईक व मानाची पैठणी द्वितीय क्रमांक फ्रिज तृतीय क्रमांक ४३ इंची एलईडी टीव्ही, चतुर्थ क्रमांक वाशिंग मशीन, पाचवा क्रमांक मिक्सर व लकी ड्रॉ विजेत्यास सोन्याची नथ बक्षीस व मानाची पैठणी जिंकणारा विजेता मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष योगेश बहल , पिंपरी चिंचवड महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, विरोधी पक्षनेते नाना काटे, मा. नगरसेवक विनोद नढे, संतोष कोकणे या प्रमुख मान्यवरांनी प्रभाग क्रमांक २२ मधून येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवार सौ.मोनिका नवनाथ नढे यांना मोठ्या प्रमाणात मतदान करून त्यांना विजयी करावे व प्रभागातील नागरिकांची सेवा करण्याची संधी द्यावी, सर्व सामान्य नागरिकांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, आणि  प्रभागातील महिलांसाठी खास आयोजित केलेल्या न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमांमध्ये महिलांच चांगला प्रतिसाद पाहून सौ मोनिका नवनाथ नढे यांचे कौतुक केले व त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी मोनिका नढे म्हणाले की, प्रभागातील सर्व सामान्य नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत, त्यांना येणाऱ्या अडीअडचणी, समस्या जाणून घेऊन मार्गी लावणे, समाजात सध्या सुरू असलेल्या स्त्री अत्याचारावर आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे. यावेळी सर्व महिलांनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्व महिलांची प्रश्न सोडवण्यासाठी , प्रभागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी , त्यांच्या सुरक्षिततेसाठी व सामाजिक, राजकीय धार्मिक आरोग्य शैक्षणिक सेवेच्या माध्यमातून मी अनेक कामे करण्याचा संकल्प केला असे बोलून त्यांनी कार्यक्रम मध्ये विजयी झालेल्या महिलांना शुभेच्छा दिल्या व  कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या महिलांचे मनापासून आभार व्यक्त केले.

Leave a Comment

और पढ़ें