जबरी चोरी करणाऱ्या चार आरोपींना अटक.
पुणे :सतीश जाधव. माझा न्यूज 24
दि. 12रोजी फिर्यादी व त्यांचे ऑफिसमधील सहकारी साई रेसिडेन्सी समोर, सुतारवाडी, पुणे येथे पायी जात असताना चार अनोळखी इसमांनी दोन काळ्या रंगाच्या स्कूटरवर येऊन त्यांना अडवले.
आरोपींनी “तुम्ही आमच्या बँकेचे कार्ड घेतले आहे, आम्हाला तुमची झडती घ्यायची आहे” असे सांगून जबरदस्तीने झडती घेतली व मारहाणीची धमकी देत फिर्यादींच्या खिशातील ₹40,000/- रोख रक्कम काढून घेतली.
या प्रकरणी बाणेर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 111/2026, भा.न्या.सं. कलम 309(4), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
तपास व अटक कारवाई
सदर गुन्ह्याचा तपास करताना पोलीस पथकाने घटनास्थळावरील व परिसरातील 72 CCTV फुटेज तपासून आरोपींचा माग काढला.
खालील आरोपींना अटक करण्यात आली:
दिनेश बाळू मंडपे (वय 33 वर्षे, पिंपरी, पुणे)
रोहन रमेश सूर्यवंशी (वय 31 वर्षे, पिंपरी, पुणे)
लक्ष्मण कृष्णा वाल्हेकर (वय 46 वर्षे, पिंपरी, पुणे)
संतोष राम कांबळे (वय 31 वर्षे, पिंपरी, पुणे)
चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
जप्त मुद्देमाल
आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन स्कूटर जप्त करण्यात आल्या आहेत.
पुढील तपास
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पुणे शहर पोलीस करत आहेत.
