अवैध अग्निशस्त्रासह दोन जणांना अटकअवैध अग्निशस्त्रासह दोन जणांना अटक.
दि. 06/04/2026 रोजी पोलिस उपनिरीक्षक किरण लिटे व त्यांच्या पथकातील अंमलदार भोर्डे, चव्हाण आदी कर्मचारी हे त्यांच्या हद्दीत गस्त घालत असताना, पोलिस अंमलदार निलेश भोर्डे व सुनील चव्हाण यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, अभिरुची मॉलच्या बाजूला असलेल्या द्वारका लॉज येथे रूम नं. 205 मध्ये एका व्यक्तीकडे पिस्तूल आहे.
ही माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना कळविण्यात आली. त्यांच्या आदेशानुसार पोलिस पथकाने तात्काळ द्वारका लॉज येथे जाऊन रूम नं. 205 वर छापा टाकला.
दरवाजा उघडल्यानंतर आत दोन इसम आढळून आले. त्यांची नावे व पत्ते विचारले असता:
साहिल सतीश मेहर (वय 31 वर्षे)
रा. द्वारका लॉज, रूम नं. 205, मूळ रा. नानाचौक, तपोवन रोड, सावेडी, अहमदनगर
शुभम सचिन अजेत्राव (वय 21 वर्षे)
रा. संतोष नगर, लेन नं. 03, कात्रज, पुणे
यांची झडती घेतली असता त्यांच्या बॅगेतून एक लोखंडी पिस्तूल, 04 जिवंत काडतुसे (राऊंड) व दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले.
या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नं. 06/2026 अन्वये आर्म अॅक्ट कलम 3, 25 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रविंद्र डोईफोडे करीत आहेत.
ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
