निवडणूकीच्या काळात गावटी पिस्टल जप्त.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

निवडणूक काळात गावठी पिस्टलसह रेकॉर्डवरिल आरोपीला केले जेरबंद
पुणे :प्रतिनिधी:
पुणे
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात ‘ कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, निवडणूक प्रक्रिया ‘ शांततेत पार पाडणे तसेच कोणत्याही प्रकारच्या अनुचित प्रकारांना प्रतिबंध घालण्याच्या उद्देशाने पुणे शहर पोलीस दलाकड़ून, वेळोवळी नाकाबंदी. गुन्हेगार चेकींग अशा कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहे. त्याअनषांने हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत सातत्याने गस्त व पेट्रोलींग करण्यात येत आहे
त्यानुसार संजय मोगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक , हडपसर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक अधिकारी पोलीस उप निरीक्षक, हसन मुलाणी, सत्यवान गेंडव पोलीस अंमलदार ‘ यांचे पथक निवडणुक काळातील कायदा व सुव्यवरथा अनुषंगाने गोंधळेनगर भागात पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार कुंडलीक केसकर, तुकाराम झुंजार यांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरून पोलीस रेकॉर्डवरिल आरोपी रोहन राजकुमार गायकवाड, वय २० वर्ष, रा.गोंधळेनगर , हडपसर, पुणे यास ताब्यात घेवून त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस असे एकुण 41,200 रु. किंमतीचा शस्त्र मिलळा. त्याबबत हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं 1099/2025 भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) . मपोका कलम ३७(१)(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास हसन मुलाणी, पोलीस उप निरीक्षक हे करीत आहेत
कामगिरी अपर ‘ पोलीस आयुक्त, मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ 6 डॉ.सागर कवडे,.सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर,अतुलकुमार नवगिरे यांचे मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ,संजय मोगल, पोलीस निरिक्षक (गुन्हे), निलेश जगदाळे यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, अंमलदार दिपक कांबळे , भाऊसाहेब खटके निलेश किरवे, बापु लोणकर, भगवान हंबर्डे, अजित मदने, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर , महाविर लोंढे, आकाश धावडे व विजय कानेकर यांनी केली

Leave a Comment

और पढ़ें