सराईत गुन्हेगाराकडून सोन्या, चांदीचे दागिन्यासह अग्निशस्त्र जप्त.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी
पोलीस आयक्त विनय कुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाढत्या घरफोडी व चोरीचे गन्हे उघडकीस आणणेसाठी गन्हे शाखा यांना विशेष आदेशीत केले आहे. त्याप्रमाणे पोलीस उप आयूक्त, (गन्हे) डॉ. शिवाजी पवार , सहायक पोलीस आयूक्त डॉ.विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गन्हे शाखा यूनिट २ चे प्रभारी अधिकारी . अरविंद पवार यांच्या अधिपत्याखाली पोलीस अधिकारी व अंमलदार घरफोडीचे व चोरीचे गन्हयांचा बारकाईने अभ्यास करुन संशयीत व सराइत आरोपींचा शोध घेत होते
दिनांक २७ रोजी गन्हे शाखा यनिट २ चे पथक हद्दीत पेट्रालिंग करुन चोरीचे गन्हयांचा समांतर तपास करीत असताना तांत्रिक विश्लेषणाचे आधारे व पोहवा विक्रम कुदळ यांना त्यांचे गोपनिय आधारे माहीती मिळाली की, रावेत पोलीस स्टेशन गन्हा रजि नं ५६९/२०२५ भा.न्या.सं कलम ३०५,३३१(२) या गन्हयातील संशयीत आरोपी हे हिंजवडी पोस्टे गुरनं ९६९/२०२५ या गुन्हयातील चोरी केलेल्या वाहनाने सोमाटणे टोलनाक्यावर येणार असले बाबत गोपनिय माहिती मिळाली. सदर ठिकाणी यनिट २ चे वपोनि अरविंद पवार व त्यां्च टिम सापळा रचन थांबली असताना पहाटे 5.30 चे सूमारास मिळालेल्या बातमी प्रमाणे एक राखाडी रंगाची मारुती सुझुकी कंपनीची सेलेरिओ कार क्रमांक एम ए १४ जेई २६२८ ही आली असता सदर कारला थांबवन गाडीतील संशयित आरोपीतांना कार बाहेर येणेबाबत सांगितले असता सदर गाडीमधील आरोपी याने त्यांचे जवळील गावठी पिस्टलने अरविंद पवार व स्टाफ यांना जिवे मारण्याचे उद्देशाने त्यांचे दिशेन राऊंड फायर केला असता गाडीचे उजव्या बाजस असलेले पोहवा राठोड यांनी प्रसंगावधान राखन सदर आरोपीचे हातातील पिस्टल हिसकावण्याचा प्रयल्न केल्याम्ळे सदर राउंड हे गाडीचे टपाला लागन आरपार गेली. त्यावेळी शिताफिने पोलीस पथकाने 3 आरोपीना ताब्यात घेवन त्यांना नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे,सनिसिंग पापासिंग दधानी वय २४ वर्षें रा.गल्ली क्र ५. श्री साई सोसायटी मागे शिकलकर वस्ती, बिराजदार नगर , हडपसर, जलसिंग राजपूतसिंग दधानी, वय ३२ वर्ष रा सर्हें नं 90 रामटेकडी, हडपसर , मनिष बाब्लाल क्शवाह वय २८ वर्ष रा गाव पोस्ट कैलास, तहसील कैलास जि मुरायना राज्य मध्यप्रदेश असे असलेबाबत सांगितले त्याचे गाडीची तपासणी केली असता त्यांचेकडे 2 देशी बनावटीचे पिस्टल, 7 जिवंत’ काडलुस चोरीच्या गुन्हयातील सोन्या चांदीचे दागिने, धारधार शस्त्रे असे वर्णनाचा एकुण 8,87,000 किमतीचा माल मिळन आला.

Leave a Comment