सराईत चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

:प्रतिनिधी :रात्रीच्या वेळी घरफोडी करणा-या इसमास घेतले ताब्यात
यूनिट-४ चे पथक विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असतान पथकाला बातमीदारामार्फत बातमी मिळाली की. चंदननगर परिसरात घरफोडी करणारा बबल्या चौगले ह काळया रंगाच्या स्प्लेंडर मोटार सायकलवर घरफोडीतील सोन्याचे दागिने विक्री करण्याकरीता खडकी भागात येणार आहे . अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने यनिट-४ चे पोलीस पथक होळकर ब्रिजजवळ सापळ लावन थांबले. थोड्याच वेळात बातमीतील इसम द्चाकीसह आलेला दिसल्याने त्यास सदर पोलीस पथकाने ताब्यात घेतले त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव रुतीक ऊर्फ बबल् संजय चौगले, वय २१ वर्षे रा.वॉटर सप्लाय शेजारी झोपडपट्टी, आळंदी रोड फुलेनगर , विश्रांतवाडी, पुणे. असे असल्याचे सांगितले सदर आरोपीकडे अधिक तपास केला असता त्याचेकडे सोन्याचे दागिने मिळन आले. सदर सोन्याच्य दागिन्याबाबत विचारणा केली असता सदरचे दागिने त्याने त्याचे इतर दोन साथीदारांचे मदतीने दि.10 रोजी पहाटे घर फोडी करुन चोरले असल्याचे कबूल केले. त्याचेकड्न एकुण 2,67,200- चे सोन्याचे दागिने व एक स्प्लेंडर मोटार सायकल जप्त करणेत आली आहे. आरोपीला पूढील कायदेशीर कारवाई करीता चंदननगर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले . पढील तपास चंदननगर पोलीस स्टेशन करीत आहे
ही कामगिरी अपर पोलीस आयक्त गन्हे, पंकज देशमुख,पोलीस उप- आयुक्त गुन्हे, निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-२.राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली यूनिट 4कडील पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांचे सचनेप्रमाणे सहा पोलीस निरीक्षक अमर कदम, पोलीस उप-निरीक्षक वैभव मगदुम पोलीस अंमलदार हरीष मोरे, किशोर ‘दुशिंग, सुभाष आव्हाड , अमजद शेख, तुषार खराडे,संजय आढारी,विठ्ठल वाव्हळ, प्रविण भालचिम व भरत गुडवाड यांनी केली

Leave a Comment

और पढ़ें