मानकर चौकात भीषण अपघात.: पिंपरी-चिंचवड: प्रतिनिधी :
वाकडच्या मानकर चौक परिसरात उशिरा रात्री झालेल्या भीषण अपघातात प्रदीप शिंदे गंभीर जखमी झाले असून धडक देणारा बोलरो पिकअप चालक फरार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
17 नोव्हेंबर, रात्री 11.40 ते 11.50 च्या दरम्यान युग होंडा येथे हा अपघात झाला. काम आटोपून दुचाकीवरून घरी जाणाऱ्या प्रदीप शिंदे यांना भरधाव वेगात आलेल्या बोलरो पिकअप ने जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर चालक पळून गेला.
अपघातात प्रदीप शिंदे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या गर्भवती पत्नीला देखील धक्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.
द्वारकानाथ शिंदे यांच्या तक्रारीवरून वाकड पोलिसांनी चालकावर भारतीय न्याय संहिता व मोटार वाहन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे
या प्रकरणाचा तपास वाकड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माळी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे 









