आयटीसी कंपनी म्यानेजर ची ल्यापटॉप, हरवलेली ब्याग पोलिसांनी दिली मिळवून.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

आज दिनांक 15/04/2026 रोजी आयटीसी कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. निशांत कुमार यांची लॅपटॉप बॅग हरवली होती. सदर बॅगमध्ये ॲपल कंपनीचे मॅकबुक लॅपटॉप, स्वतःचा व कुटुंबीयांचा पासपोर्ट, बँकेची क्रेडिट व डेबिट कार्ड्स तसेच इतर महत्त्वाची कागदपत्रे होती.

 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निलेश बडाख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. गणेश जगदाळे, पोलीस हवालदार रमेश मेमाने व पोलीस अंमलदार सुशील बेंद्रे यांनी अतिशय शिताफीने कामगिरी करून अवघ्या 2 तासांच्या आत सदर बॅग शोधून काढली व ती श्री. निशांत कुमार यांच्या ताब्यात सुपूर्द केली.

सदर कामगिरीबद्दल श्री. निशांत कुमार यांनी संबंधित पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

सविनय सादर,

निलेश बडाख

वरिष्ठ पोलीस निरीक्षक

चंदननगर पोलीस स्टेशन