शिरूर परिसरात अमली पदार्थांविरोधात कारवाई.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शिरूर परिसरात अमली पदार्थांविरोधात कारवाई

पुणे :सतीश जाधव+
शिरूर परिसरात अमली पदार्थ बाळगणारे व सेवन करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांनी कारवाई करून तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या ताब्यातून 47.60 ग्रॅम वजनाचा एम.डी. (MD) अमली पदार्थ तसेच दोन चारचाकी वाहने असा एकूण 21,52,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या “नशामुक्त भारत अभियान” अंतर्गत पुणे ग्रामीण हद्दीत अमली पदार्थ तसेच तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री व सेवन रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
दिनांक 17/04/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, शिरूर परिसरात काही इसम एम.डी. अमली पदार्थ बाळगून विक्रीसाठी फिरत आहेत. त्यानुसार सापळा रचून कारवाई करण्यात आली.
अटक करण्यात आलेले आरोपी:
विशाल मारुती मोरे (वय 20, रा. शिरूर)
प्रतीक संतोष लांघे (वय 25, रा. शिरूर)
मिथुन विजयपाल सिंग (वय 26, रा. शिरूर)
त्यांच्याकडून:
47.60 ग्रॅम एम.डी. ड्रग
दोन चारचाकी वाहने
एकूण किंमत: ₹21,52,000/- मुद्देमाल
जप्त करण्यात आला.
या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून NDPS कायद्यानुसार कारवाई सुरू आहे.
तपासातील महत्त्वाची बाब:
तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की आरोपींनी अमली पदार्थांची खरेदी करून ते डिलिव्हरी अ‍ॅपच्या माध्यमातून (पोर्टर सारख्या सेवेतून) पुरवठा केला जात होता. संबंधित पुरवठादारांचा शोध सुरू असून, या नेटवर्कमधील इतर व्यक्तींवरही कारवाई होणार आहे.
पुढील कारवाई:
युवकांमध्ये वाढणारा ड्रग्सचा वापर रोखण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले