जुन्यातील आरोपीला मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने शिताफीने अवघ्या सहा तासांत जेरबंद केले.
खुनातील मुख्य आरोपी व अनेक गुन्ह्यांत सहभागी असलेला सराईत गुन्हेगार कौशल कमलेश लांबगे (वय 20 वर्षे, रा. शिवराय कॉलनी, गल्ली नं. 02, फराटे चौक, काळेपडळ, हडपसर, पुणे) यास मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अटक केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंगाधाम चौकामध्ये दिनांक 20/04/2026 रोजी पहाटे 04:45 वा. सुमारास रोहन कांतीलाल ओव्हाळ (जो एक सुप्रसिद्ध रॅपर व रील स्टार होता) याचा पेव्हर ब्लॉकने डोक्यात मारून व बॅटने शरीरावर गंभीर जखमा करून खून करण्यात आला होता.
या प्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गु.र. नं. 70/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान हा खून सराईत गुन्हेगार कौशल लांबगे याने केल्याचे निष्पन्न झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक आरोपीच्या शोधात होते. आरोपी हा सतत आपले लोकेशन बदलत असल्यामुळे त्याला पकडणे कठीण जात होते.
तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी हा डायस प्लॉट, स्वारगेट परिसरातील झोपडपट्टीत लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तपास पथकाने सापळा रचला.
पोलीस पथक पोहोचताच आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस अंमलदारांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. आरोपी त्या ठिकाणावरून पळून जात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले, तेव्हा त्यांनी संपूर्ण पथकास संकेत भाषेत अलर्ट केले. पथकातील राजेश थोरात, कौस्तुभ जाधव, किरण जाधव, महेबूब नदाफ, दिनेश माने यांनी तत्काळ पाठलाग करून थोड्याच अंतरावर आरोपीस ताब्यात घेतले.
आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी प्रथम स्वतःची ओळख सांगून त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने आपले नाव कौशल कमलेश लांबगे (वय 20 वर्षे, रा. शिवराय कॉलनी, गल्ली नं. 02, फराटे चौक, काळेपडळ, हडपसर, पुणे) असे सांगितले.
त्यानंतर आरोपीस मार्केटयार्ड पोलीस ठाणे, पुणे येथे आणून अटक करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली.
तसेच दाखल गुन्ह्यातील इतर दोन विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेऊन त्यांना बालसुधारगृहात ठेवण्यात आले असून पुढील योग्य ती कारवाई सुरू आहे.कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या आदेशाने तपास पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
या पथकात पोलीस उपनिरीक्षक सुनील भापकर, पोलीस हवालदार राजेश थोरात, कौस्तुभ जाधव, किरण जाधव, महेबूब नदाफ, गोरख चिंके, बालाजी शिंदे, दिनेश माने, संदीप सूर्यवंशी, आशीष यादव आदींचा समावेश होता.आरोपीला पळताना पाठलाग करून पकडले
ओळख पटवून अटक केली
इतर दोन अल्पवयीन आरोपींनाही ताब्यात घेतले
पूर्ण कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी
