मोबाईल चोरटा चार तासात जैरबंद.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत श्रीराम निवास, साईनाथनगर भागातील घरामधून एकूण ७ मोबाईल चोरीला गेल्याची घटना घडली होती.

 

दि. 27 रोजी या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नं. 171/2026 अंतर्गत भा.न्या.सं. कलम 305(+) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे वेदांत गणेश चव्हाण (वय 19 वर्षे, रा. मांजरी, पुणे) याच्यावर संशय घेतला. त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता:

चोरीस गेलेले ७ मोबाईल फोन

व इतर साहित्य मिळून एकूण ₹66,000 – किमतीचा मुद्देमाल

हस्तगत करण्यात आला.

विशेष म्हणजे, हा गुन्हा फक्त ४ तासांच्या आत उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले.

कारवाईतील अधिकारी

ही कारवाई खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली:

अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग), पुणे शहर

पोलीस उपायुक्त, परिमंडळ-7, पुणे शहर

तसेच:

वरिष्ठ पोलीस निरीक्षक – चंदननगर पोलीस स्टेशन

पोलीस निरीक्षक (गुन्हे)

सहाय्यक पोलीस निरीक्षक व इतर कर्मचारी

यांनी संयुक्तपणे ही कामगिरी पार पाडली.